Ad will apear here
Next
शिवाजी विद्यापीठातर्फे परिसर छायाचित्रण स्पर्धा; ५० हजारांची पारितोषिके
११ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत


कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठातर्फे शिवाजी विद्यापीठ परिसर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे ५० हजार रुपयांची पारितोषिके व प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील गुणी कलाकार आणि छायाचित्रकार यांच्या माध्यमातून विद्यापीठ परिसराचे कलात्मक छायाचित्रण मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे, या दृष्टीने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणतः विद्यापीठ परिसरातील नव्या, जुन्या इमारती आणि स्थापत्य, जलसाठे, उद्याने, जैवविविधता या विषयांवरील छायाचित्रे असावीत. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि दहा हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रे (सॉफ्ट कॉपी) देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठीची छायाचित्रे सादर करण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत आहे. 

छायाचित्रे सादर करण्याचा पत्ता : उद्यान विभाग, अनेक्स बिल्डिंग, पहिला मजला, मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

स्पर्धेसाठीचे नियम व अटी : 
स्पर्धेत सहभागासाठी वयाची अट अथवा भौगोलिक बंधन नाही. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी स्पर्धकाला जास्तीत जास्त पाच छायाचित्रे सादर करता येतील. प्रत्येक छायाचित्राची ८ बाय १२ इंच आकाराची प्रत (हार्ड कॉपी) सादर करावी लागेल, तसेच त्या छायाचित्रांची हाय रिझॉल्युशन सॉफ्ट कॉपीसुद्धा सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेअंतर्गत सादर केलेले छायाचित्र ताजे, अलीकडच्या काळातील असावे. जुन्या छायाचित्रांचा विचार केला जाणार नाही. छायाचित्र कोठे काढलेले आहे, त्या ठिकाणाची थोडक्यात माहिती त्यासोबत द्यावी. छायाचित्रांचे संपादन, प्रोसेसिंग याविषयीची माहितीही सोबत द्यावी. कॅमेरा, तसेच मोबाइलद्वारे काढलेल्या छायाचित्रांचा एकत्रितच विचार केला जाईल. त्यासाठी स्वतंत्र गट नाही. याबाबतचा अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील. विद्यापीठाचे कर्मचारी अगर त्यांचे कुटुंबीय या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत. स्पर्धेसाठी सादर झालेल्या छायाचित्रांचे स्वामित्व हक्क शिवाजी विद्यापीठाकडे राहतील. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZYLCG
Similar Posts
‘खेती करो हरिनाम की, मनवा...’ खेती करो हरी नाम की मनवा, खेती करो हरी नाम की। पईसा ना लागे रुपिया ना लागे, कवडी न लागे फुटकी।। मन के बैल सुरत पोहावे, रसि लगाऊँ गुरू ग्यान की। कहत कबीरा सुन भाई साधु, भक्ति करो हरीहर की।। या आणि यांसारख्या कबीराच्या दोह्यांनी शिवाजी विद्यापीठाचा परिसर मकर संक्रांतीच्या दिवशी (१५ जानेवारी २०२०) नादमय होऊन गेला होता
डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यामुळे तळागाळातील विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यामुळेच तळागाळातील, बहुजन समाजातील मुलांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात स्थान लाभले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन योजना आणि डॉ. अप्पासाहेब
मोडी लिपी शिकायचीय? कोल्हापुरात मोफत प्रशिक्षण कार्यशाळा कोल्हापूर : मोडी लिपी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ३० डिसेंबर २०१९ ते पाच जानेवारी २०२० या कालावधीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मोडी लिपीचे मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्यामार्फत मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे
जीवनशैलीत पूरक बदलांनी ‘पीसीओडी’वर मात शक्य : डॉ. सचिन कुलकर्णी कोल्हापूर : ‘जीवनशैलीमध्ये पूरक बदल आणि योग्य आहार व नियमित व्यायामाने वजन कमी करणे या बाबींच्या सहाय्याने महिलांना पॉलिसिस्टीक ओव्हेरियन आजारावर (पीसीओडी) निश्चितपणे मात करता येते,’ असे प्रतिपादन कोल्हापुरातील प्रिस्टीन महिला हॉस्पिटलमधील वंध्यत्व व आयव्हीएफ या विषयांचे प्रख्यात तज्ज्ञ डॉ. सचिन कुलकर्णी यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language